Woman Gives Birth On Mumbai Local Train: कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch)

या महिलेच्या मुलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची माहिती दिली असून, एक हृदयस्पर्शी व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Woman Gives Birth On Mumbai Local Train

मुंबईमधून एक अनपेक्षित आणि दुर्मिळ घटना समोर आली आहे. एका महिलेने कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय लोकल ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिला आहे. प्रसूती प्रक्रियेदरम्यान महिलेची इतर महिला सहप्रवासी आणि महिलेच्या मुलीने काळजी घेतली. या महिलेच्या मुलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची माहिती दिली असून, एक हृदयस्पर्शी व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या मुलीने इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज सकाळी माझ्या आईने कोणत्याही वैद्यकीय पुरवठ्याशिवाय धावत्या लोकल ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिला. इतर प्रवाशांनी तिला मदत केली आणि सर्वकाही सुखरूप पार पडले. माझी आईला मदत करणाऱ्या सर्व महिलांना धन्यवाद. बाळ सुखरूप आणि निरोगी आहे. आई, मला तुझा अभिमान आहे.' मुलीने पुढे स्पष्ट केले की तिची गर्भवती आई नियमित तपासणीसाठी जात असतना तिची प्रसूती झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ѵɑıꜱɦռɑѵı ɾɑϳɛ 👑 (@dhanashree_ulhas_raje_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)