BMC: मुंबई महानगरपालिकेने नवरात्रीच्या शुभेच्छा देत नागरिकांना केले 'हे' आवाहन
दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे.
आजपासून (7 ऑक्टोबर 2021) नवरात्रीचा सण सुरू होत आहे. दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव 9 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या प्रसंगी अनेक राजकीय नेते, खेळाडू, कलाकार सोशल मीडियाच्या माध्यामातून नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनेही नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांना सुरक्षित राहण्याचे आणि दांडिया न खेळण्याचे आवाहन केले आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)