Weather Update Tomorrow: मान्सूनची जोरदार हजेरी, आज दमदार पाऊस; उद्याचे हवामान कसे असेल? घ्या जाणून

आयएमडीने उद्याचा हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनच्या पुढील 2-3 दिवसांत, मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे

Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनच्या पुढील 2-3 दिवसांत, मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.” दरम्यान, नैऋत्य मान्सून काल (8 जून) अपेक्षेपेक्षा चार दिवस आधी ओडिशात दाखल झाला आणि मलकानगिरी जिल्ह्यातील काही भाग व्यापला. याव्यतिरिक्त, IMD ने रविवारी (9 जून) केओनझार, मयूरभंज, बालासोर, भद्रक, मलकानगिरी, कोरापुट आणि रायगडा जिल्ह्यांतील काही भागात 30-40 किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह वादळाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी उद्याचे हवामान पर्जन्यवृष्टीस पोषख असणार आहे.

दरम्यान, “नैऋत्य मान्सून रविवारी (9 जून) ओडिशात दाखल झाला आहे. यात ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे,” भुवनेश्वरमधील आयएमडीच्या प्रादेशिक केंद्राने सांगितले. मान्सून उद्या अधिक प्रगती करणार असून मुसळधार पावसाची जोरदार शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे. (हेही वाचा, IMD Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी)

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now