Water Leakage At Jogeshwari Metro Station: मुंबईत मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी मेट्रो स्थानकात पाणी गळती; MMMOCL ने मागितली जाहीर माफी (Video)
सोशल मिडिया X वर एका वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेशनच्या छतावरून पाणी गळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ 25 सप्टेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Water Leakage At Jogeshwari Metro Station: सध्या मुंबईमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस शहराला झोडपत आहेत. अशात प्रशासनाच्या निकृष्ट कामांची अनेक उदाहरणे सामोरे येत आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईतील जोगेश्वरी मेट्रो स्थानकावरील पाण्याची गळती दिसत आहे. सोशल मिडिया X वर एका वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेशनच्या छतावरून पाणी गळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ 25 सप्टेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOL) ने 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली.
ते म्हणाले, ‘मेट्रो स्टेशनवरील पाणीगळतीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मुसळधार पावसामुळे हे घडले. पावसामुळे काही भागात पाण्याच्या जास्त दाबामुळे पाण्याचे पाईप त्यांच्या स्थानावरून निखळले गेले. या समस्येवर ताबडतोब लक्ष देण्यात आले असून, मुसळधार पाऊस असूनही टीमने काल रात्री याची दुरुस्ती पूर्ण केली. आम्हाला आशा आहे की तुमचा आमच्या मेट्रोचा प्रवास सुरक्षित झाला असेल.’ रेड लाईन 7 च्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या जोगेश्वरी मेट्रो स्टेशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जानेवारी 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले. (हेही वाचा: Mumbai Rains Update: अंधेरी सबवे मध्ये पाणी साचल्याने रस्ता वाहतूकीसाठी बंद)
मुंबईत मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी मेट्रो स्थानकात पाणी गळती-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)