Mumbai Rain Alert: पुढील 1 तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी, नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला
यावेळी मुंबईकरांना घरातच राहा, बाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागानं मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. पुढील एक तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी मुसळधार पावसाचा इशारा हा जारी केला आहे. मुंबईत पुढील तासाभरात 40-50 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मुंबईकरांना घरातच राहा, बाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -