Thane Rain: बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस; नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केले खास क्षण (Watch Videos)

रहिवाशांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उपनगरात वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास इतका असणार आहे.

Thane Rain Video (PC - X/@BobSays25)

Thane Rain: राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. आता मुंबईतील (Mumbai) अनेक उपनगरात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. आज बदलापूर (Badlapur) शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील या अवकाळी पावसाची अनेक दृश्य नेटिझन्सनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे.

याशिवाय, ठाणे आणि पालघर, कल्याण, बदलापूर आणि अंतर्गत भागात पुढील 2 तासात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रहिवाशांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उपनगरात वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास इतका असणार आहे.

पहा व्हिडिओ -

ठाणे आणि पालघर, कल्याण, बदलापूर आणि अंतर्गत भागात पुढील 2 तासात मुसळधार पाऊस - 

ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस - 

मुंब्रा आणि ठाण्यात मुसळधार पाऊस -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)