Uddhav Thackeray Speech Live Streaming: उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद; पहा त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण (Watch Video)

उद्धव ठाकरे यांचा हा संवाद तुम्ही फेसबुक तसेच वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता.

Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास आयोगाने बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतरिम आदेशात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वापर दोन्ही गटांना करता येणार नाही, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत.

उद्धव ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून आज संध्याकाळी 6 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. उद्धव ठाकरे यांचा हा संवाद तुम्ही फेसबुक तसेच वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif