Uddhav Thackeray Dussehra Rally: उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान, म्हणाले- 'महाराष्ट्रात निवडणुका घ्या, जनता तुम्हाला खरी शिवसेना कोण हे सांगेल'
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्या पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्या पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना’ पक्ष नाव नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे दोन्ही गमावल्यानंतर हा पहिला मेळावा होता. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्रात निवडणुका घ्या आणि त्यावेळी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला (एकनाथ शिंदे) खरी शिवसेना कोण हे सांगेल. मी तुम्हाला महाराष्ट्रात निवडणूक घेण्याचे आव्हान देतो,’ असे ठाकरे म्हणाले.
‘गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावे यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय. मुंबई लुटण्याचा डाव आखला जातोय. मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारामध्ये तिला उभे करायचे आहे. पण जे मुंबई तोडतील त्यांना आम्ही तोडू, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन दिला. (हेही वाचा: Prakash Ambedkar on Mohan Bhagwat: प्रकाश आंबेडकरांचा इशारा, '..तर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू')
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)