उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना 8 ऑगस्टपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागेल; निवडणूक आयोगाने दिले निर्देश

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे कॅम्पने 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 लोकसभा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे कॅम्प या दोघांना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या लेखी विधानांसह पक्षात बहुमताचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर दोन्ही गटांनी त्यांचे म्हणणे सादर केल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी घेईल.

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे कॅम्पने 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 लोकसभा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले आहे, जेणेकरून निर्णय घेण्यापूर्वी त्यांना युक्तिवाद करण्याची संधी मिळावी. मात्र आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे कॅम्पने केला आहे, तर त्याला ठाकरे गटाने जोरदार आव्हान दिले आहे.