Pune Crime: वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार; पोलिसांचीही तक्रार दाखल करण्यास दिरंगाई (Watch Video)

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडित व्यक्तीच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांकडूनही तक्रार दाखल करण्यास दुर्लक्ष करण्यात आले.

Photo Credit- X

Pune Crime: वारजेत (Warje) दुचाकास्वारी लुटमार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री 8.30 वाजता गणपती मठाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना निरंजन माने नावाच्या 53 वर्षीय व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याचे (Robbery)समोर आले आहे. माई मंगेशकर रुग्णालयाजवळील कावेरी हॉटेल लेनजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अडवले. आरोपींनी त्यांना धमकावले. त्यांच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे (Police) धाव घेतली. मात्र, अधिकाऱ्यांनी शिफ्ट बदलण्याचे कारण देत तक्रार दाखल करण्यास उशीर केला. माने यांना सकाळी परत येण्यास सांगितले.

वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now