Mumbai Pune Expressway: सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर ट्राफिक जाम; सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त पोस्ट

खालापूर टोल नाका पास केल्यानंतरची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दृश्य समोर आली आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नागरिक ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे सोशल मिडीया एक्सवर संताप व्यक्त करत आहेत.

Mumbai Pune Expressway: सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्राफिक जाम झाल्याचं (Traffic on Mumbai Pune Expressway)पहायला मिळत आहे. ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे नागरिक सोशल मिडीया एक्सवर संताप व्यक्त करत आहेत. 20 मिनीटापासून गाडी एक इंचही पुढे सरकलेली नाही. अशा संतप्त पोस्ट नागरिकांनी शेअर केल्या आहेत. खालापूर टोल (Khalapur Toll)नाका पास केल्यानंतरची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दृश्य समोर आली आहेत. गुरूवारी 15 ऑगस्ट, त्यानंतर एक दिवस सोडला तर, शनिवार आणि रविवार आल्यामुळे पर्यटनासाठी नागरिक मुंबईबाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना ट्राफिक जामचा सामना करावा लागत आहे.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now