TMC च्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांचा दिवाळी बोनस; महापौर नरेश म्हस्के यांची घोषणा

कोविड संकटात अविरतपणे कामे केलेल्या ठाणे पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांचा बोनस जाहीर झाल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

दिवाळी बोनस Photo Credits: IANS)

ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आल्याची घोषणा नरेश म्हस्के यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या यात हा बोनस दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसंच यामुळे पालिकेवर 12-15 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.

पहा व्हिडिओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement