Pune: हीच माझ्या कामाची पावती! मनसे नेते निलेश माझिरे यांच्या घरवापसीनंतर वसंत मोरेंचे ट्विट चर्चेत
यात पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. v
तीन दिवसांपूर्वी मनसे सोडल्याची घोषणा करणारे पुण्यातील मनसेचे नेते निलेश माझिरे यांनी घरवापसी केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची समजूत काढली. यात पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वसंत मोरे हे निलेश माझिरे यांना घेऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांनी माझिरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माझिरे यांनी मनसेतच राहायचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीही करुन टाकली. यानंतर वसंत मोरेंनी ट्विट करत हीच माझ्या कामाची पावती म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)