Mumbai Water Supply Update: मुंबईकरांनो पाणी वापरा पण जपून! पुढील दोन दिवस मुंबई शहरात पाणी कपात, महापालिकेकडून विशेष सुचना जारी
उद्या म्हणजेचं ३० जानेवारी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी १० पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद असण्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर काही भागात केवळ २५ टक्के पाणी येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
२९ जानेवारी 2023 म्हणजेचं आजपासून ते ४ फेब्रुवारी पर्यंत मुंबई शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्यावर याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तरी उद्या म्हणजेचं ३० जानेवारी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी १०पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद असण्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या प्रभागात येणार्या माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम येथील पाणीपुरवठा 25 टक्के कमी असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)