राज्याला सध्या 35 हजार Remdesivir मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत
महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असताना आता राज्यातील निर्बंध 15 मे पर्यंत पर्यंत वाढवण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्याला सध्या 35 हजार रेमडेसिवीर मिळत आहेत, मात्र गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर वापरल्यास त्याचे दुष्परिणामही होतील त्यामुळे असे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा.