'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे'; नारायण राणेंच्या टीकेला संभाजीराजेंचे उत्तर?

'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे'- संभाजी राजे

Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही अशा शब्दात भाजप नेते नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. त्यावर संभाजी राजे यांनी, 'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, ' अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.