Mumbra cylinder blast: ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भंगारच्या दुकानाला आग, घटनेत तीन जण जखमी

ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका भंगारच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbra Cylinder blast

Mumbra cylinder blast: ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका भंगारच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती  मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. मुंब्रा येथील चांद नगर परिसरात ही घटना घडली. सिलिंडर स्फोट झाल्याने दुकनाला आग लागली. दुकानातील सर्व सामानाचं मोठं नुकसान झाल आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement