Chhatrapati Shivaji Maharaj Hospital:रुग्णालयाच्या आत येण्याचा रस्ता मोठा, मात्र बाहेर जाण्याचा रस्ता फक्त वरती; 17 बळींनंतर आव्हाड भडकले

रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकारावरुन जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) रोष व्यक्त करत ठाणे प्रशासनावर आणि राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये (Thane Hospital) आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यापूर्वी 10 ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)