Thane Goes in Dark Mode: ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी; शहरभर पसरली अंधाराची झालर (Watch Video)

राज्यात 7 ते 14 सप्टेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Thane Rains (संग्रहित संपादित प्रतिमा)

ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे इथली दृश्यमानताही कमी झाली आहे. अनेक लोकांनी सोशल मिडियावर पावसाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सायंकाळी 4.30/5 वाजता संपूर्ण शहरावर अंधाराची झालर पसरली आहे. राज्यात 7 ते 14 सप्टेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement