Thane: मेट्रोच्या कामामुळे ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथील वाहतुकीत 10 फेब्रुवारीपर्यंत बदल

ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथील वाहतुकीत 10 फेब्रुवारीपर्यंत बदल करण्यात येत आहेत

ठाणे-नाशिक मार्ग (संग्रहित संपादित प्रतिमा)

मेट्रोच्या कामामुळे ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथील वाहतुकीत 10 फेब्रुवारीपर्यंत बदल करण्यात येत आहेत. कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल/ चिरागनगरकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड येथे प्रवेश बंद असणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून, कॅडबरी जंक्शनवरून मुंबई-नाशिक महामार्गाने ज्युपीटर हॉस्पीटल समोरून डावीकडे वळण घेवून सर्व्हिसरोडने इच्छित स्थळी जाता येईल. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement