Thane Fire Video: मानपाडा येथे तेल वाहून नेणाऱ्या टॅंकरला आग, रस्त्यावर वाहतूक सेवा विस्कळीत

ठाण्यातील मानपाडा येथे रविवारी सकाळी एका टॅंकरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई घोडबंदर रोजवरून जात असताना आग लागली. ही घटना दुर्गा कट्टा, चितळसर मानपाडा नाक्यासमोर घडली.

Thane Fire Video PC Twitter

Thane Fire Video: ठाण्यातील मानपाडा येथे रविवारी सकाळी एका टॅंकरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई घोडबंदर रोजवरून जात असताना आग लागली. ही घटना दुर्गा कट्टा, चितळसर मानपाडा नाक्यासमोर घडली. आग लागल्यामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. ही घटना सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. टॅंकर  साजिद अली (२८) चालवत होता. टॅंक केशव पांडे यांच्या मालकीचा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ट्रॅंकरमध्ये २५ हजार लिटर तेल होते. ते घेऊन नवी मुंबई येथील मनोर येथे जात होते. आगीची माहिती मिळताच, ट्रॉफिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.आगीत ट्रॅंकरचे भरपूर नुकसान झाले.  पोलिसांनी रस्त्यावरून वाहतूक सेवा सुरळीत केली.  (हेही वाचा-  पुणे यथील विमान नगर परिसरात फिनिक्स मॉलला आग,)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now