SW Monsoon 2023 Update: नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पुढील 48 तासात गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात सरकरण्याचा IMD चा अंदाज

आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये उकाड्याने त्रासलेल्या लोकांना पावसाची प्रतिक्षा आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. दरम्यान काल रात्री महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात रत्नागिरी मध्ये ढगांंच्या गडगडाटासह पाऊस बरसला आहे. नक्की वाचा: Cyclone Biparjoy: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या तयारीसाठी रायगड जिल्हा प्रशासनानेकडून मार्गदर्शक तत्वे आणि हेल्पलाइन क्रमांक जारी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement