Thane: उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video
या इमारतीच्या तळमजल्यावर सूर संगीत हॉटेल आणि बार आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Thane: आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 6.56 च्या सुमारास ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या पहिल्या मजल्यावर (तळ मजला + 4 मजले) आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर सूर संगीत हॉटेल आणि बार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी आणि वर्तक नगर विभाग समितीचे कर्मचारी, एक फायर ट्रक, एक पाण्याचा टँकर आणि दोन बचाव वाहनांसह घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जावानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा -Mumbai: अंधेरी येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची भिंत कोसळली; 5 जण जखमी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)