मोबाईलवरून गेम खेळल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला क्रिकेटच्या गेमिंग ॲप मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले सोमनाथ झेंडे, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या दीड कोटीमुळे त्यांचे नशीब पालटले आहे. सध्या क्रिकेट विश्वचषक सामने सुरू आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती.
पाहा पोस्ट -
पुण्यातल्या पोलिसाला ऑनलाईन गेममध्ये लागले दीड कोटी रुपये!#Pune #Police #OnlineGaming #MTShorts pic.twitter.com/cwXCFRep5K
— Mumbai Tak (@mumbaitak) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)