बीबीसीची डॉक्युमेंटरी कॅम्पसमध्ये दाखविल्यास होणार कठोर कारवाई- TATA Institute of Social Sciences
यामुळे कॅम्पसमधील शांतता धोक्यात येऊ शकते.
बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या वादग्रस्त माहितीपटाबाबतचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. हैदराबाद विद्यापीठात ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यानंतर जेएनयू आणि जामियामध्ये स्क्रिनिंगवरून गोंधळ झाला आणि आता दिल्ली विद्यापीठात बीबीसीची ही डॉक्युमेंटरी दाखविण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ही डॉक्युमेंटरी दाखवण्याबाबत चर्चा सुरु आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने शुक्रवारी सांगितले की, काही विद्यार्थी बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याची योजना आखत आहेत. संस्थेने त्याच्या स्क्रीनिंगला परवानगी दिलेली नाही. यामुळे कॅम्पसमधील शांतता धोक्यात येऊ शकते. संस्थेच्या नियमांच्या विरोधात कोणतेही कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल.