Maharashtra State Official Song: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 हे गीत अंगिकारण्यात येत आहे.
महाराष्ट्राला राज्याचे स्वतःचे राज्यगीत मिळाले आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 हे गीत अंगिकारण्यात येत आहे. शाहीर साबळे यांनी गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राजा बढे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत.
व्हिडिओ पहा