Special Session of State Assembly: 2 आणि 3 जुलै रोजी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन; होणार सभापती निवड

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

State Assembly (Photo Credits-ANI)

आज संध्याकाळी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आता माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार आहेत. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement