Sion Road Bridge: सायन ओव्हर ब्रिज बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील रस्ते नो पार्किंग म्हणून घोषित, पाहा

बृहन्मुंबई पोलिस वाहतूक विभागाने जारी केलेल्या औपचारिक सूचनेनुसार, सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढण्यासाठी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Sion Road Bridge: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हर ब्रिज बंद करण्यात आला आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. बृहन्मुंबई पोलिस वाहतूक विभागाने जारी केलेल्या औपचारिक सूचनेनुसार, सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढण्यासाठी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी हा ब्रिज पूर्णपणे  बंद करण्यात आला आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून खालील रस्ते नो पार्किंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. याची माहिती त्यानी ट्विटवर पोस्ट शेअर करुन दिली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील दिलेला चार्ट एकदा पाहून घ्या...

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement