Akshay Shinde Encounter: आदर्श विद्यामंदीर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर नंतर शिंदे गटाकडून आज स्टेशन वर बॅनरबाजी करत पेढे वाटप (Watch Video)
'नराधमाला शिक्षा मिळालीच' म्हणत शिंदे गटाचे काही शिवसैनिक आज बदलापूर स्टेशन वर पोहचले होते. त्यांनी तेथे पेढेही वाटले आहेत.
आदर्श विद्यामंदीर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चा काल (23 सप्टेंबर) एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्या एन्काऊंटर वर अनेक प्रश्न आणि संशय असताना आज सकाळी बदलापूर स्टेशन वर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आनंद व्यक्त करत बॅनरबाजी केल्याचा आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान काल रात्री देखील अक्षयच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर अनेकांनी फटाके देखील फोडले होते. Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे च्या मृतदेहाचं पोस्टमार्टम आज जे जे हॉस्पिटल मधील तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम करणार .
बदलापूर स्टेशन वर पेढे वाटप
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)