Shiv Sena UBT Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली उमेदवारांची यादी; पहा कोणाला मिळाले कुठून तिकीट

काँग्रेस-शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 85-85-85 जागांवर म्हणजेच 270 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उर्वरित 18 जागा युतीत समाविष्ट असलेल्या अन्य पक्षांना देण्यात येणार आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 2024 ची पहिली यादी जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी 65 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय ठाण्यातून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाने केदार दिघे यांना कोपरीतून तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये यादी जाहीर करणारा उद्धव गट पहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) याद्या येणे बाकी आहे.

काँग्रेस-शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 85-85-85 जागांवर म्हणजेच 270 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उर्वरित 18 जागा युतीत समाविष्ट असलेल्या अन्य पक्षांना देण्यात येणार आहेत. इतर पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, एसडब्ल्यूपी आणि सीपीआय (एम) यांचा समावेश आहे. मंगळवारी राज्यातील 288 जागांसाठी महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा निर्णय झाला. दरम्यान, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. (हेही वाचा: Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान)

Shiv Sena UBT Candidate List:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now