शिवसेना खासदार Sanjay Raut आर्थर रोड तुरुंगातून लिहित आहेत पुस्तक; जाणून घ्या काय आहे विषय

राऊत यांच्या निकटवर्तीयांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, कोर्टाने राऊत यांना वर्तमानपत्रे, पुस्तके आणि लेखन साहित्याचा प्रवेश दिला आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter/ANI)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून पुस्तक लिहित आहेत. ते आपला साप्ताहिक स्तंभ रोकठोक लिहू शकत नाहीत आणि म्हणून पुस्तक लिहिण्यासाठी ते त्यांचा वेळ वापरत आहेत. हे पुस्तक प्रामुख्याने त्यांच्यावर दाखल झालेले खटले आणि त्यांचा लढा यावर आहे. राऊत यांच्या निकटवर्तीयांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, कोर्टाने राऊत यांना वर्तमानपत्रे, पुस्तके आणि लेखन साहित्याचा प्रवेश दिला आहे. ते नोट्स घेत आहेत आणि त्याचे संकलन करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक राऊत हे तुरुंगातून संपादकीय लिहित असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now