NCP New Working Presidents: शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Sharad Pawar | (Image Credit - ANI Twitter)

NCP New Working Presidents: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पक्षाच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. दिल्लीत पक्षाच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sharad Pawar announces Praful Patel, Supriya Sule working presidents of NCP

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now