Namdev Jadhav Ink Attack: पुण्यात प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना

नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते.

प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement