Barsu Refinery Project: बारसू प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण शरद पवारांच्या भेटीला
या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते.
बारसू रीफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. pic.twitter.com/iihotJPEds
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

