Accident in Parshuram Ghat: मुंबई-गोवा हायवे वर परशुराम घाटात अपघात; 10 जण जखमी
अनेक वाहनं एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये 10 जणं जखमी झाली आहेत.
मुंबई गोवा हायवे वर परशूराम घाटामध्ये झालेल्या अपघातामध्ये 10 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. बस, कार, ट्रेलर आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बराच वेळ परशूराम घाटामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. हा अपघात आज 3 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजता झाला आहे. सध्या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)