Maharashtra Cabinet Portfolio: रखडलेल्या खातेवाटपावर आज शिक्कामोर्तब! अखेर राज्याच्या तिजोरीची चावी अजित पवारांकडे; पहा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांची यादी

तसेच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Cabinet Portfolio: गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज झालं आहे. राज्यपालांनी खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी केली आहे. भाजपकडून सहा तर शिंदे गटातील तीन मंत्र्याची खाती काढण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत. तसेच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील यांची सहकार मंत्री तर धनंजय मुंडे यांची कृषी मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. (वाचा - Maharashtra Political Crisis: 16 आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)