Satish Pradhan Dies: ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

30 डिसेंबर दिवशी सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Satish Pradhan | X @SampathSharda

शिवसैनिक, ठाण्याचे पहिले महापौर आणि माजी राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. ठाण्यात मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र आज (29 डिसेंबर) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या 30 डिसेंबर दिवशी त्यांच्या पार्थिवावर  ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत या दु:खद बातमीला दुजोरा देत आदरांजली अर्पण केली आहे.

सतीश प्रधान यांचे निधन  

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratap Sarnaik (@pratap_sarnaik)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement