Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023 Timetable: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, 11 तारखेला श्रीक्षेत्र आळंदीवरुन होणार प्रस्थान
3 जुलै पर्यंत पालखी पंढरपूर येथे मुक्कामी असणार असून पंढरपूर येथील गोपाळकाल्याच्या कार्यक्रम होऊन पालखीचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.11जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीतून निघून पालखी पुण्यातील भवानी पेठ, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)