Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. खास करुन शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु केली आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. खास करुन शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे वरिष्ठ राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया यांनी सैफ अलिखान याच्या कुटुंबीयांशी आणि आप्तेष्ठांशी फोनद्वारे संपर्क साधला आणि चौकशी केली.
सुप्रिया सुळे यांनी साधला खान कुटुंबीयांशी संवाद
हा हल्ला पूर्वनियोजीत?, जितेंद्र आव्हा यांची शंका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव 'तैमुर' ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
सर्व बाजूंनी तपास व्हावा- आव्हाड