Rupali Chakankar: अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत रुपाली चाकणकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोग हे बालविवाह रोखण्यासाठी अतिशय सकारात्मक आहे यासाठी अक्षय्य तृतीया व अशा काही विशिष्ठ मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांमार्फत स्थानिक लोकप्रतिनिधी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना बालविवाह रोखण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या अशी विनंती मा.मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)