Aryan Khan Bail: आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया, पहा ट्विट
आर्यन खानला जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुख खानच्या चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 27 दिवसांनंतर गुरुवारी कोर्टातून जामीन मिळाला आहे. 23 वर्षीय आर्यन खानला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी स्वत: मीडियाला ही माहिती दिली. आर्यनला कोर्टातून कोणत्या आधारावर जामीन मिळाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आर्यन उद्या किंवा परवापर्यंत तुरुंगातून बाहेर येणार आहे. आर्यनच्या वकिलाने सांगितले की, हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर येईल. आर्यन खानला जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुख खानच्या चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहा ट्विट