Ration Card Food Items Rates: मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर, घ्या जाणून

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत.

रेशनकार्ड (Photo Credits- Facebook)

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत डिसेंबर, २०२३ साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना – तांदूळ मोफत दराने प्रती शिधापत्रिका २० किलो, गहू मोफत दराने प्रति शिधापत्रिका १५ किलो व रु. २०/- दराने प्रति शिधापत्रिका १ किलो साखर (सुलभ पॅकिंगसह) असे आहेत.

बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे दर मुंबई शहर व मुंबई उपनगर (दि. १ डिसेंबर २०२३) नुसार रुपये 68.96  ठाणे विभाग (दि. 4 डिसेंबर 2023) नुसार (36/फ) रु. 69.35/-, ठाणे (41/फ) रु.69.35/-, मुंब्रा (48/फ) रु.69.35/-, वाशी (41/ फ) रु. 69.35/-, भाईंदर (41/फ) रु.69.35/-, कल्याण (38/फ) रु. 69.53/-, डोंबिवली (मुख्य) (39/फ ) रु. 69.53/-, डोंबिवली (उप) (39/फ) – 69.53, उल्हासनगर (मुख्य) (40/फ) रु. 69.61/-, उल्हासनगर (उप) (40/फ) 69.61, अंबरनाथ (46/फ) रु. 69.61/-, बदलापूर (46/ फ) रु. 69.61/-, भिवंडी (37/फ) रु. 69.44/- प्रति लिटर या प्रमाणे असून 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर वाटप करण्यात येईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी कळविले आहे. (हेही वाचा: Mobile Shop on e-Vehicle: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत उपलब्ध होणार फिरत्या वाहनावरील दुकान; जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement