Rangoli Competition: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच बीएमसीच्या कर्मचा-यांसाठी रांगोळी स्पर्धा; जाणून घ्या डिटेल्स
या स्पर्धेत, 3 गट असणार असून तिन्ही गटांसाठी रोख रकमेची स्वतंत्र पारितोषिके आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी येत्या 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोअर परळ (पूर्व) परिसरातील ना. म. जोशी मार्गावर असणा-या महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित होणा-या या स्पर्धेत, 3 गट असणार असून तिन्ही गटांसाठी रोख रकमेची स्वतंत्र पारितोषिके आहेत. रांगोळी स्पर्धेसाठी मर्यादित प्रवेश असल्याने प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून, यासाठीच्या प्रवेशिका या दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीदरम्यान रांगोळी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)