Raj Thackeray Tweet: सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांनी आपली भुमिका मांडू नये, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची न्यायालयीन लढाई या सारख्या मुद्यांवर पक्षाच्या सैनिकांनी कोणतीही भूमिका मांडू नये, असं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसाठी आदेश काढला आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची न्यायालयीन लढाई या सारख्या मुद्यांवर पक्षाच्या सैनिकांनी कोणतीही भूमिका मांडू नये, असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असे त्यांनी आवाहन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)