Raj Thackeray Speech Highlights: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टीकेला राज ठाकरेंचे उत्तर; मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम
Raj Thackeray Speech Live Streaming
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. विविध मुद्द्यांवर त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर टीका केली होती. या सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अनेक सत्ताधारी नेत्यांनी राज ठाकरे यांना आपापल्या शब्दात प्रत्युत्तर दिले होते. आता आज ठाणे येथे राज ठाकरे महाविकास आघाडीमधील नेत्यांना उत्तर देणार आहेत. या सभेला ‘उत्तरसभा’ असे नाव मनसेकडून देण्यात आले आहे. खालील ठिकाणी तुम्ही या सभेचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेमधून पंतप्रधान मोदींना दोन कायदे करण्याचे आवाहन केले आहे. सामान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा, अशी विनाणती त्यांनी मोदींना केली आहे.
ते म्हणाले, 'मी माझी भूमिका बदलतो असे शरद पवार सांगत आहेत, परंतु मी माझी भूमिका कधी बदलली? पाकिस्तानी कलाकारांना देशातून कोणी हाकलले... मनसेने. आझाद मैदानात दंगलीत पोलीस भगिनींना मारहाण झाली, पत्रकारांच्या गाड्या जाळल्या गेल्या, तेव्हा कुणीच काही बोलले नाही मात्र त्यावेळी मनसेनेच मोर्चा काढला होता.' राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'ते (संजय राऊत) शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत हेच काळात नाही.'
पुढे त्यांनी, राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ईदच्या सणापर्यंत मुदत दिली. तोपर्यंत राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून 3 एप्रिलपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला.
ठाण्यातील पोलिसांना माझ्या गाड्यांचा ताफा लहानसहान संघटनांकडून अडवला जाणार आहे, याची माहिती मिळते. पण याच गुप्तचर यंत्रणांना शरद पवार यांच्या घरावर लोक जाणार आहेत, हे कळाले नाही, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली.