Raj Thackeray's Warning: 'अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे'; मुलुंड मधील घटनेनंतर राज ठाकरेंनी पुन्हा ठणकावलं
मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला कामासाठी जागा न दिल्याने घडलेल्या प्रकारावर मनसे अध्यक्षांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
मुंबईच्या मुलुंड भागात काही दिवसांपूर्वी एका मराठी महिलेला कामासाठी जागा नाकरल्याचा प्रकार समोर आला. तिने आपली हकिकत सोशल मीडीयात एका व्हिडिओद्वारा सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या महिलेला मदत केली. संबंधित सोसायटीच्या सचिवांना आपल्या शैलीत समजावल्यानंतर त्यांनी माफी मागितली. यावर ट्वीट करत राज ठाकरेंनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 'अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे' असं सांगत महाराष्ट्रात जर असा प्रकार पुन्हा घडला तर गालावर वळ उठतील हे निश्चित. असंही म्हटलं आहे. या ट्वीट मध्ये त्यांनी सरकारचाही जरा धाक हवा असं म्हणत त्यांचेही कान पिळल्याचे पहायला मिळाले आहे.
राज ठाकरे ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)