Rahul Gandhi's Image As Doormat: महाराष्ट्रातील मंदिरामध्ये पायपुसणी म्हणून वापरला राहुल गांधींचा फोटो? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch)
या फोटोवर पाय देऊन भाविक मंदिरामध्ये जात आहेत.
Rahul Gandhi's Image As Doormat: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहापासून सोशल मीडियापर्यंत गदारोळ सुरू आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्याला ‘हिंदूंचा अपमान’ अशी टीका भाजपने केली आहे. आता राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या असत्यापित व्हिडिओमध्ये राहुल गांधींचा फोटो मंदिराच्या पायऱ्यांवर लावण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील एका मंदिरामधील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील एका मंदिराच्या पायऱ्यांवर पायपुसणी म्हणून राहुल गांधींचा फोटो दिसत आहे. या फोटोवर पाय देऊन भाविक मंदिरामध्ये जात आहेत. राहुल गांधींच्या फोटोसोबत त्यावर लिहिले आहे की, ‘हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि मंदिरात मुलींना छेडण्यासाठी लोक जातात हे म्हणणाऱ्या राहुल गांधींची लायकी पाय पुसणीची आहे.’ (हेही वाचा: Hindu Remarks Row: राहुल गांधींच्या भाषणाचा विपर्यास करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, शंकराचार्य यांनी हिंदू धर्मासंबंधीच्या विधानावर केले भाष्य)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)