Pune Metro Update: पुणेकरांनो लक्ष द्या! होळी सणामुळे 14 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद
होळी सणामुळे 14 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद राहणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वरून ही माहिती दिली.
पुणे मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. होळी सणामुळे 14 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद राहणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वरून ही माहिती दिली. ते म्हणतात, ‘पुणेकर मेट्रो प्रवाशांसाठी… धुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा शुक्रवार, दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत बंद असणार आहे. तसेच दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल.’ पुणे मेट्रोने सर्व स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची योजना आखली आहे. रविवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) स्थानकाजवळील रुळांवर चढून राष्ट्रवादी-सपाच्या निदर्शकांनी मेट्रोचे कामकाज दोन तास रोखल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. (हेही वाचा: Arijit Singh Pune Concert: पुण्यात 16 मार्च 2025 रोजी गायक अरिजित सिंगचा कॉन्सर्ट; वाहतूक पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध व पर्यायी मार्ग)
Pune Metro Update:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)