Pune: पुण्यात अतिमुसळधार पाऊस, नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन; प्रशासनाने जारी केला हेल्पलाईन क्रमांक

पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे

Representational Image | (Photo Credits: PTI)

पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.  पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मोहोळ स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

गरज पडल्यास पुढील नंबरवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधू शकता -

020-25506800 / 1/2/3/4

020-25501269

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement