Pune Fire Video: रविवार पेठ परिसरात पहाटे तीन मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

रविवार पेठ परिसरात पहाटे किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Pune Fire Video: रविवार पेठ ( Raviwar Peth)परिसरातील तीन मजली इमारतीला आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील किराणा दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दला (fire brigade)च्या तीन गाड्या आणि एक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. पुणे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. आगीत दुकाने जळून खाक झाली आहेत. (हेही वाचा:Thane Fire Video: मानपाडा येथे तेल वाहून नेणाऱ्या टॅंकरला आग, रस्त्यावर वाहतूक सेवा विस्कळीत )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now